Mala Ho Mhantat Lavangi Mirchi Song Lyrics – Ranglya Ratree Asha Mar Movie

Also, read about:

Mala Ho Mhantat Lavangi Mirchi Song Lyrics

नाव गाव कशाला पुसता
अहो मी आहे कोल्हापुरची
मला हो म्हणतात लवंगी मिरची

हा डौल झोक हा नटारंगीचा ढंग
वाऱ्यावर लवते जशी चवळीची शेंग
हर घडीला नखरा नवा, डोळा हो डावा
झाकुनी फेकिन नजरेची बरची

हा लाल डाळींबी शालू पदर जरतारी
ही हिरवी हिरवी चोळी तंग भरदारी
नका पाहू न्याहाळुन अशी, पडाल तुम्ही फशी
जणु मी नागीण झाडावरची

या तिखटपणावर जाऊ नका हुळहुळून
घायाळ शिकारी हरिणी जाईल पळून
हिरव्या रानात दिसते उठून, नका घेऊ खुडून
अहो मी पाव्हणी बारा घरची