Vinchu Chavla Song Lyrics

Vinchu Chavla Song Lyrics

हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
दुष्काळात मायचा माझा आटला होता पान्हा
पीठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पीठामंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …

कन्याकाट्या वेचायला माय जायी रानी
पायात नसे वहांन तिच्या फिरे अनवाणी काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …

बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बस झाला शिक्षान आता घेऊदी हाती कामं शिकून शानं कुठं मोटा मास्तर होणार हाय
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …

दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप
थर थर कापे अन लागे तिले धाप
कसायाच्या दावणीला बांधली जसी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …

बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी सांग म्हणे राजा तुजी कवा येईल राणी
भरल्या डोळ्यान कधी पाहीन दुधावरची साय तवा मले सायीमंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …

म्हणून म्हनतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जल्म घेवा माये तुझी पोटी
तुझ्या चरणी ठेवून माया धरावं तुजं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले …

Also, Read about movie download websites: